Udayanraje bhosale And Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

'आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर...'; खासदार छत्रपती उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा : राज्यात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे . त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपचे नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊतही विरोधकांचा खरपूस समाचार घेत आहे. मध्यंतरी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics Latest News In Marathi)

साताऱ्यात छ.उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते,त्यावेळी पत्रकारांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांना संजय राऊतांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांना त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच'.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

संजय राऊत हे शिवेंद्रसिंहराजे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले होते की, 'संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती. यामध्ये कोल्हापूरचे संजय पवार आणि नंदूरबारचे पारवे यांचा नावाचा विचार सुरु होता. मात्र, आम्ही संजय पवार यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT