Chhatrapati Shivaji Maharaj, Udayanraje Bhosale, Raigad saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : रायगडावर जाण्यापुर्वी उदयनराजेंचे माेठं विधान (पाहा व्हिडिओ)

रायगडावर जाण्यापुर्वी उदयनराजेंनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale : आज महापुरुषांचा अवमान हाेत आहे. त्याबाबत काेणीही बाेलत नाही. काेणी तरी बाेलले पाहिजे. मी माझी जबाबदारी टाऴू शकत नाही. मी स्वत: शिवभक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा वारसा सांगत असताना मी आवाज उठविला नाही तर नैतिकदृष्टया मला या वाड्यात राहण्याचा अधिकार राहत नाही. उदयन जे माझे नाव आहे त्यापुढे राजे हा सन्मान लावण्याचा देखील आम्हांला अधिकार राहणार नाही असे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी सातारा येथे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

राज्यपाल भगत सिंह काेशयारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याची भावना काही दिवसांपासून राज्यभरात उमटू लागली आहे. काेशयारी यांचा वक्तव्याचा निषेध उदयनराजेंनी नुकताच नाेंदविला हाेता. राजेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापुरुषांचा हाेणार अवमान राेखण्यासाठी ठाेस पावलं उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यावेळी निर्धार शिवसन्मानाचा अशी भुमिका जाहीर करीत राजेंनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक हाेऊन वेदना मांडणार असल्याचे नमूद केले हाेते.

आज सातारा येथील जलमंदिर पॅलेस (jalmandir palace) येथे उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन रायगडला रवाना झाले. त्यापुर्वी माध्यमांशी बाेलताना राजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान म्हणजेच सर्व महापुरुषांचा सन्मान आला असे म्हटलं. ते म्हणाले माझ्याशी काेणीही चर्चा केलेली नाही. मला जे याेग्य वाटते ते मी करीत आहे. ज्यांना ज्यांना जे वाटत आहे ते ते त्यांनी करावे असेही राजेंनी स्पष्ट केले.

नरेंद्र, शिवेंद्र, उदयन ही नावं गाैण

आज ना उदया सर्वांना जायचे आहे. त्यामुळे काेण काय बाेलते याला महत्व नाही. नरेंद्र, शिवेंद्र, उदयन ही नाव गाैण आहेत. परंतु विचार महत्वाचा आहे. त्यामुळे मी जर काही केले नाही तर माझं दुर्देवच म्हणावे लागेल असेही राजेंनी नमूद केले.

लाेक काेडगी झाली आहेत

महापुरुषांचा हाेणार अवमान हे काेणाचा अपयश आहे या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले लाेक काेडगी झाली आहेत. साेयीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन राजकारण करायचे एवढेच केले जात आहे. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांनी सांगितली पाहिजे कसं काय वागावं. दुर्लक्ष करुन वेळ मारुन नेली जाते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT