Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या पुतळ्यावरुन मंत्र्यांचा चढला पारा; थंडीत बैठकीतील वातावरण गरम

या बैठकीला आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.
Uday Samant
Uday SamantSaam Tv

- जितेश कोळी

Chhatrapati Shivaji Maharaj : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत चिपळूण पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना कामात चालढकल केल्याने धारेवर धरले. विकासकामांच्या तांत्रिक मंजुरीसाठी उशीर केल्याच्या मुद्द्यावरून मंत्री सामंत यांनी मुख्याधिका-यांना जाब विचारला.

चिपळूण (chiplun) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निधी मंजूर झालेला असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात का झाली नाही, असा सवाल पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना विचारला. त्यावेळी अजून कामाला तांत्रिक मंजुरी घेतली नसून आज त्यासाठी (ratnagiri) जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकारी गेले आहेत असे उत्तर आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांचा पारा वाढला.

Uday Samant
Sharad Pawar News : शरद पवार जाणता राजा ही छत्रपती शिवरायांशी तुलना अयाेग्य : नरेंद्र पाटील

यावेळी मुख्यधिकाऱ्यांना सूचना करतानाच यापुढे असा ढिसाळ कारभार चालणार नाही अशा सूचना देखील उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Uday Samant
Sai Resort News : बहुचर्चित साई रिसॉर्टच्या 'त्या' अतिक्रमणावर कारवाई सुरु (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com