Sanjay Raut on Suresh Dhas Dhananjay Munde SaamTV
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'धस-मुंडे भेटीत मोठी डील', सुरेश धसांवर राऊतांचे आरोप; राऊतांच्या आरोपांनी धस संशयाच्या फेऱ्यात

Sanjay Raut on Suresh Dhas : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होतायत. त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी सुरेश धस यांनी मोठं रान पेटवलं होतं.

Prashant Patil

मुंबई : बीड मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपांचं रान पेटवणारे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आलेत. ते त्यांनी घेतलेल्या धनंजय मुंडेंच्या भेटीनं. सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले. ज्या वेगाने त्यांनी आकावर हल्ले केले. आता त्याला अचानक ब्रेक लागला. त्यावरून संजय राऊतांनी धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राऊतांनी धसांना कसं घेरलंय पाहूया.

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होतायत. त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी सुरेश धस यांनी मोठं रान पेटवलं होतं. आता तेच संशयाच्या फेऱ्यात अडकलेत. धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय. सुरेश धस यांची डील झालीय, त्यामुळे देशमुख प्रकरणाला ब्रेक लागलाय, असा आरोप संजय राऊतांनी केलाय.

भाजप आमदार सुरेश धसांनी सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरलं होतं. मुंडेंचे नीकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सरपंच हत्या प्रकरणात समावेश असल्यावरून धसांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी सुरेश धस आणि मुंडेंची गुपचूप भेट झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर संजय राऊतांनी धस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच सुरेश धस यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? असा सवाल संजय राऊतांनी केलाय.

बीड प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोप प्रत्यारोप झालेत. आता सुरेश धस राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देणार हेच पाहायचं. यातून धस आणखी नवे आरोप मुंडे आणि कराडवर करणार की आपली बाजू सावरणार हेच पाहायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची संकल्प महासभा, निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

SCROLL FOR NEXT