navneet rana , uddhav thackeray, amit shah saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana : गद्दार अमितभाई नव्हे, गद्दारांना संपविणारे नेते; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबाेल

खासदार नवनीत राणा आज अमरावती जिल्हा दाै-यावर हाेत्या.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Navneet Rana : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) घेतलेली शपथ खरी हाेती याबद्दल शंका वाटते असे मत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केले आहे. अमरावती येथे खासदार राणांनी माध्यमांशी बाेलताना भाजप नेते अमित शहा हे महाराष्ट्रवर (Maharashtra) कधीच अन्याय करणार नाहीत असंही म्हटलं. (Amravati Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन अमित शहा यांनी गद्दारी केली असं म्हटलं हाेते. त्यावर खासदार नवनीत राणा यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत ज्या दिवशी आम्हांला काँग्रेस सोबत युती करायची वेळ येईल त्याच दिवशी आम्ही राजकारण बंद करु. यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं पाहिजे. (Breaking Marathi News)

गद्दारी कोणी केली हे आम्हांला चांगलं माहिती आहे असेही खासदार राणा यांनी म्हटलं. त्या म्हणाल्या बिहारमध्ये कमी सीट असूनही नितेश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. त्यामुळे महाराष्ट्रावर अमित शहा अन्याय करु शकतं नाही असा विश्वास व्यक्त करत राणांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची खरी शपथ घेतली असं मला वाटत नाही असेही नमूद केले. (Navneet Rana News)

अंधेरी पोटनिवडणुकीवर बाेलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या लोकांनी त्या पार्टीची व कार्यकर्त्याची क्षमता पाहून मदत केली पाहिजे. जर क्षेत्राचा विकास करायचा असला तर राज्यात व केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर जाऊन आपण विकास केला पाहिजे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारासह 100 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Bridal Skin Care Tips: नवरीसाठी खास 5 स्किनकेअर टिप्स, लग्नात चेहऱ्यावर येईल चमक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT