Imtiaz Jalil/Raj Thackeray
Imtiaz Jalil/Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेनंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. सभेत राज ठाकरे आपल्या मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. ४ तारखेला मी शांत बसणार नाही. ४ तारखेला जिथे कुठे अजान वाजेल त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा असे आवाहन राज ठाकरे यांनी तमाम हिंदूंना केले आहे. आता याच राज ठाकेंच्या सभेवर एमआयआमचे खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आली आहे. (Raj Thackeray Aurangabad Speech)

राज ठाकरेंचे आजचे भाषण ऐकल्यानंतर असे वाटते की त्यांचे हे अल्टीमेटम मुस्लीम समाजासाठी नाहीतर सरकारसाठी आहे. आणि आमची अपेक्षा अशी आहे की सरकार विशेष: गृहखाते याबाबत योग्य निर्णय घेईल असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंनी अगोदर तीन तारखेचा अल्टीमेटम दिला होता. परंतु आता त्यांनी तो चार तारखेला केला आहे. मला असे वाटते की त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे तुम्ही हनुमान चालीसा लावा मी अयोध्येला जातो, तुम्ही तुमच्या अंगावर केस घ्या मी अयोध्येला जातो. जी युवा पिढी आज नोकऱ्यांसाठी तरसत आहे त्या युवा पिढीला आपण वेगळ्या मार्गाला लावत आहोत असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरेंची भूमिका ही भाजप रिमोट कंट्रोल द्वारे कंट्रोल करत आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायचे काम सरकारचे असते. भाजपचे सरकार असताना भोंग्याबाबतीत निर्णय का नाही घेतला असा प्रश्न जलील यांनी विचारला आहे. मागचे दोन वर्ष पाहिले तर आपण जिवंत राहिलो हे आपले भाग्य आहे. आज वर्षभरापुर्वी आपण कोरोनाशी झुंज देत होतो. आज आपण नोकऱ्यांबद्दल बोलत नाही, आज आपण देशातील अन्य समस्यांबाबत बोलत नाही असे जलील म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे की याचा विरोध करण्याची गरज नाही, प्रतिक्रिया देण्याची गरज नाही काय तो निर्णय पोलीस घेतील. लढाई ही कायदेशीर लढू असे जलील म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT