छत्रपती उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर टीका Saam Tv
महाराष्ट्र

नारळ फोडण्याची प्रथा, कोणाची घरफोडी केली नाही, छत्रपती उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर टीका

ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे

ओंकार कदम

सातारा : आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत, असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. MP Chhatrapati Udayanraje Bhonsle Criticize MLA Shivendrasinghraje Bhonsale

ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळं केल नाही, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर उदयनराजेंनी सडकून टीका केली.

कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि धरणाचे पाणी सोडण्याच्या स्वयंचलित गेटचे पूजन प्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा -

खासदार उदयनराजे म्हणाले, काही काम झालं की आम्ही केलं म्हटले जाते. वय वाढल पण यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी होत गेलेली आहे. नारळफोडी गॅंग हो आम्हांला सार्थ अभिमान आहे. आम्ही काम करतोय, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाणे मी कमी समजतो. परंतु दिशाहीन झालेले अत्यंत सकुंचित वृत्तीची काही लोक असतात त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे असते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT