Uddhav Thackeray called MLA meeting saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटात जोरदार हालचाली! मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आमदारांना आदेश

Uddhav Thackeray called MLA meeting : कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला काही दिवसांसाठी संजीवनी मिळाली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. राज्यपालांनी घेतलेले निर्णय न्यायालयाने अवैध ठरवले असून विधीमंडळ पक्षाने नाही तर मूळ पक्षाचा व्हीपच वैध असेल असं न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. परंतु 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला काही दिवसांसाठी संजीवनी मिळाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निकालानंतर लगेच ठाकरे गटाने सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. शनिवारी 13 मे रोजी सर्व आमदारांना मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 13 तारखेला ठाकरे गटाचे सर्व आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ठाकरे गट पुढील रणनीती ठरवणार आहे.

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कोण घेणार?

सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू अध्यक्षांकडे सोपवला असला तरी त्यावर नरहरी झिरवळ निरवळ निर्णय घेणार की राहुल नार्वेकर निर्णय घेणार हे अद्याप अस्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांच्या आदेशांसंदर्भात आमदारांच्या वर्तनावर पात्र-अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत पुढील कायदेशीर बाबींवर देखील चर्चा होतील. (Latest Breaking News)

'मी नैतिकता म्हणूण राजीनामा दिला'

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला पूर्वपरिस्थिती निर्माण करता आली असती, असे निकाल देताना सुप्रीम कोर्टाने नमूद केले. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी मी तेव्हाच्या परिस्थितीला अनुसरून नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता असे स्पष्टीकरण दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस यानी टीका केली आहे. (Latest Political News)

'तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. त्यात ते म्हणाले की नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. मग भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा नैतिकता कुठे डब्यात बंद करून ठेवली होती. नैतिकतेचा मुद्दा त्यांनी सांगू नये.

तुमच्याकडे नंबर नाहीत, लोक तुम्हाला सोडून गेलेत, तुम्ही भीतीपोटी राजीनामा दिला. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच तुम्ही खुर्चीकरता विचार सोडला, एकनाथ शिंदेनी विचारासाठी खुर्ची सोडली. त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या राजीनाम्याचं बोलूच नये, असा टोला देखील फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

Madhui Dixit Hair Care Tips: माधुरी दिक्षीतने काळ्याभोर केसांचं रहस्य सांगितलं, 58 व्या वर्षीही लावते फक्त या 2 गोष्टी

Maharashtra News Live Update: जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनीची भूमिका

SCROLL FOR NEXT