Operation Sindoor Saam
महाराष्ट्र

Amravati: सुट्टी रद्द झाल्यानं आई निघाली सीमेवर, लेकराला मिठी मारली, भावनिक व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू येतील

BSF Jawans Heart-Wrenching Goodbye to Her Baby Son: अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथील बीएसएफच्या जवान रेश्मा इंगळे यांना अचानक सीमेवर हजर राहण्याचे आदेश मिळाले. मात्र, सीमेवर जात असताना लेकराला सोडताना आईला अश्रु अनावर झाले.

Bhagyashree Kamble

पहलगाम हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरातील सर्व सुरक्षा दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बीएसएफच्या जवानांना सीमेवर तातडीने तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यात रेश्मा इंगळे यांचाही समावेश होता. मात्र, सीमेवर जात असताना लेकराला सोडताना त्यांना अश्रु अनावर झाले.

रेश्मा इंगळे या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्या अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर त्यांना सीमेवर हजर राहण्याचे आदेश मिळाले. त्यांनी तातडीने सीमेवर राहण्याची तयारी दर्शवली.

त्यांना एक वर्षांचा चिमुकला आहे. त्याला सोडून जाताना रेश्मा यांना अश्रु अनावर झाल्या. रेश्मा इंगळे या सुट्टीवर आपल्या घरी, आपल्या एका वर्षाच्या चिमुकल्या बाळासोबत वेळ घालवत होत्या. मात्र, देशसेवेचे व्रत जपण्यासाठी त्यांना आपल्या लेकराला मागे ठेवून सीमेवर रवाना व्हावं लागलं.

आपली आई डोळ्यांदेखत निघून जाते हे पाहून चिमुरड्याने हंबरडा फोडला. त्या क्षणी रेश्मा इंगळेंनाही अश्रू अनावर झाले. मन हेलावून टाकणाऱ्या या क्षणाचा एकाने व्हिडिओ शूट केला आणि समाजमाध्यमांवर शेअर केला. हे दृश्य उपस्थित प्रत्येकाचं काळीज हेलावून गेलं. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT