Latur: लेकीच्या प्रसूतीसाठी आली अन् जावयाच्या घरीच केला आयुष्याचा शेवट Saam Tv
महाराष्ट्र

Latur: लेकीच्या प्रसूतीसाठी आली अन् जावयाच्या घरीच केला आयुष्याचा शेवट

शहरातील रामनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: शहरातील रामनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी लेकीच्या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने (woman) जावयाच्या घरीच असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या (self-slaughter) केली आहे. सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित महिलेनं नेमकी आत्महत्या का केली? याची कोणतीही माहिती समोर आली नाही. (mother in law commits self slaughter at son in laws house crime latur)

हे देखील पहा-

या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत. अंतेश्वरी सूर्यकांत चिगळे असे आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय सासुचे नाव आहे. अहमदपूर (Ahmedpur) तालुक्यातील हाळणी येथील रहिवासी होते. त्यांची मुलगी आपल्या पतीसोबत लातुरातील (Latur) रामनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंतेश्वरी चिगळे या काही दिवसांपूर्वी आपल्या लेकीच्या प्रसूतीसाठी जावयाच्या घरी आले होते.

गेल्या एक महिन्यांपासून त्या लेकीकडे राहत होते. दरम्यान, सकाळी चिगळे यांनी जावई राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT