Kolhapur News  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: झुलस रहें हैं कडी धूप में... या कोल्हापुरला, प्या मोहब्बत, नफरत आणि बेवफा सरबत!

कोल्हापूरमध्ये मोहब्बत, नफरत आणि बेवफा ही सरबत नागरिकांची तहान भागवत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : राज्यभरात वातावरणातील तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यभर सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. रणरणत्या उन्हात बाहेर पडताना अनेकांच्या अंगाची काहीली होत आहे. अनेक नागरिक उन्हापासून बचाव होण्यासाठी विविध उपाय करत आहेत. याचदरम्यान, कोल्हापूरमध्ये मोहब्बत, नफरत आणि बेवफा ही सरबत नागरिकांची तहान भागवत आहेत. या सरबतची चर्चा राज्यभर होत आहे. (Latest Marathi News)

सरबत पिण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड....

मोहब्बत, नफरत आणि बेवफा या अफलातून नावांमुळे आणि त्यांच्या वेगळ्या स्वादामुळे कोल्हापूरकरांची (Kolhapur) सरबतला पसंती मिळत आहे. कोल्हापुरातील एक सरबताचा स्टॉल सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्या स्टॉलवर चक्क मोहब्बत का सरबत आणि नफरत का सरबत देखील मिळतो.

आदम नदाफ या तरुणाचा ॲडीज्‌ बिर्याणी नावाचा चिकन 65 चा गाडा आहे. रोज संध्याकाळी त्याच्या गाड्यावर गर्दी असते. त्याने त्याच्या याच गाड्यावर दिवसभर हे अनोख्या नावाचे सरबत विकायला सुरुवात केली आहे.

आदम कोरोना काळामध्ये घरीच होता. त्यावेळी आपल्या व्यवसायाला नवी जोड दिली पाहिजे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं पहिल्या लॉकडाऊननंतर हे सरबत विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) झाल्यानं सर्व बंद झालं होतं. पण, नंतर हळूहळू या सरबतला चांगला प्रतिसाद मिळाला, असं आदमनं सांगितलं.

कलिंगड, सफरचंद आणि दोन्ही मिक्स असे तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे सरबत आदम विकतो. ज्यांना त्याने मोहब्बत, नफरत आणि बेवफा शरबत अशी नावे दिली आहेत. सरबत पिण्यासाठी येणारे तरुण मोहब्बत, नफरत , बेवफा सरबतची नावे घेत या सरबतांची ऑर्डर करतात. कोणाला बेवफा, कोणाला मोहब्बत, तर कोणाला नफरत सरबत आवडतो.

ताज्या कच्च्या दुधामुळे या सरबतला पाण्यातील सरबत पेक्षा एक वेगळीच चव येते, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. त्यामुळे दूध आणि फळांचे असे हे पौष्टिक सरबत चाखायला नागरिकांची गर्दी येथे वाढतानाच पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT