Sakshi Sunil Jadhav
बॅटर आबंट दही इडली-डोसा बॅटरमध्ये मिक्स केल्यावर आंबटपणामळे बॅटर चांगलं फुलतं आणि चवही वाढते.
घरी पनीर बनवताना आंबट दही वापरल्यावर पनीर तयार करण्यासाठी ती उपयोगी ठरू शकते.
पनीर किंवा इतर भाज्यांच्या ग्रेव्हीत आंबट दही घातल्याने पदार्थाला छान आंबटपणा आणि चव मिळते.
चिकन किंवा मटण मॅरिनेट करताना आंबट दही वापरल्याने मॅरिनेशनमध्ये चव आणि पोत सुधारायला मदत होऊ शकते.
कढीसाठी वेगळे ताक न वापरता आंबट दही वापरल्यावर कढीला नैसर्गिक आंबटपणा आणि चांगली चव मिळते.
इन्संट ढोकल्याच्या बॅटरमध्ये आंबट दही वापरल्यावर आंबटपणामुळे बॅटरच्या टेक्चरला मदत होऊ शकते.
दही केसांवर कंडिशनिंगसाठी वापरले जाते. मात्र खूप जुनी किंवा खराब झालेली दही केसांना लावणं टाळावं.