Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्ध महामार्गावर २३ दिवसांत १०० हून जास्त अपघात; ही कारणे आली समोर

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Mahamarg Accident Update News : राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत. समृद्धी महामार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये १०० हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांची कारणेही आता समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समृद्धी महामार्गावरून वाहने चालवताना अतिदक्षता घेण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा आहे. वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसांत वाढलेली आहे. मात्र, या महामार्गावर अपघात होऊ लागले आहेत.

अवजड वाहने आणि कारचे टायर फुटून अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी वाहनांना आग लागली आहे. हा महामार्ग 'सुस्साट' असल्यानं वाहनंही बेदरकारपणे हाकली जात असल्याचे दिसून आले आहे. वाहनाची इंजिन क्षमता आणि अनफिट वाहने असल्यानेही अपघात झाले असल्याचे समोर आले आहे.

१०० हून अधिक अपघाताच्या घटना

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०० हून अधिक अपघात झाले आहेत. ११ ते ३१ डिसेंबर दरम्यान ४ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर १ ते ६ जानेवारीपर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावर एकूण सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मलकापूर, जालना परिसरात अपघाताच्या सर्वाधिक घटना

समृद्धी महामार्गावर मलकापूर ते जालना या दरम्यान सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये जनावरे आणि वन्यप्राण्यांचाही बळी गेला आहे. जनावरे आणि वन्यप्राण्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता महामार्गाच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवण्यास सुरुवात केली आहे.

ही आहेत अपघातांची कारणे

समृद्धी महामार्गावरील अपघातांची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. वाहने अतिवेगाने चालवणे, अनफिट वाहने, वाहने चालवताना चालकांना डुलकी लागणे, टायर फुटून अपघात होणे आदी कारणे आहेत.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बेदरकारपणे वाहने हाकली जातात. याशिवाय अनफिट वाहनेही या महामार्गावरून नेली जातात. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळेही अपघात होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दक्षिण भारतात भाजपच्या १० जागाही येणार नाहीत'; आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

Health Tips: वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचे करा अशापद्धतीने सेवन, दिसेल लवकर रिझल्ट

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

SCROLL FOR NEXT