IMD Rain Alert Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Return Rain : आजपासून परतीचा पाऊस सुरु होणार; मराठवाडा-विदर्भाला झोडपून काढणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert Maharashtra : आज सोमवारपासून परतीचा पाऊस सुरु होणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आजपासून परतीचा पाऊस सुरु होणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

मुंबईत कोसळणार पाऊस

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारपासून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात तुफान पाऊस

मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तयारीत राहणे गरजेचे आहे.

विदर्भात पावसाचा इशारा

पूर्व, पश्चिम आणि मध्य विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २ ते ५ मिमी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ मिमी, तर यवतमाळ जिल्ह्यात १९ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात ५ ते ७ मिमी, भंडारा जिल्ह्यात ४ ते ७ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १४ मिमी व गडचिरोली जिल्ह्यात १२ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे.

पुण्यात पावसाला सुरुवात

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व नगर जिल्ह्यांत ५ मिमी, तर सांगली व सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही दिवसभर पावसाची शक्यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी १० ते १३ किमी राहील. दरम्यान, पुणे आणि नवी मुंबईतील काही भागात सोमवारी सकाळपासूनच पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आज दिवसभर असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT