Monsoon 2024 News in Marathi Saam TV
महाराष्ट्र

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Monsoon Weather News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा लवकरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण, वेळेआधीच मान्सूनचे केरळात आगमन होणार आहे.

Satish Daud

दुष्काळ तसेच पाणीटंचाईचा झळा सहन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा लवकरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण, वेळेआधीच मान्सूनचे केरळात आगमन होणार आहे. केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि खरीप हंगामातील पेरणीही वेळेत होऊ शकते.

भारतीय हवामान खात्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात एल निनोचा प्रभाव कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे. यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी (Monsoon Weather) अनुकूल स्थिती असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, ला निना बरोबरच हिंद महासागरातही कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. हवेच्या दाबाची ही परिस्थितीही चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. परिणामी यावेळी नैऋत्य मान्सून वेळेआधीच (Monsoon 2024 News) अंदमान-निकोबारमध्ये दाखल होईल.

आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या १० दिवसांत तो केरळमध्ये येऊ शकतो. ३१ मेपर्यंत मान्सून संपूर्ण केरळला व्यापण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल.

यंदा मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील ५ वर्षांची आकडेवारी बघितली तर, २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. २०२० मध्ये १ जूनला मान्सून केरळात आा. २०२१ मध्ये ३ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले. २०२२ – २९ मे, २०२३ – ८ जून आणि २०२४ मध्ये ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT