Monsoon Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update: राज्यात मान्सून कधी सक्रीय होणार? हवामान खात्याने दिले महत्वाचे अपडेट्स

Weather Department: यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) यावर्षी मान्सूनवर परिणाम झाला.

Priya More

Mumbia Rain news: केरळपाठोपाठ मान्सून (Monsoon 2023) महाराष्ट्रातही दाखल झाला. पण अद्याप काही सक्रीय झाला नाही. शेतकऱ्यांपासून ते सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणावा तसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली आहेत. तर दुसरीकडे नागरीक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.

अशामध्ये राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) यावर्षी मान्सूनवर परिणाम झाला. त्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला.

जून महिना संपत आला तरी देखील मान्सूनने जोर पकडला नाही. काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पाऊस जोर कधी पकडणार याची सर्वजण वाट पाहत आहे. त्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे उकाड्यामुळे जनता हैराण झाला आहे. अशामध्ये हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल. तर या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून जोर धरेल आणि मुंबईकरांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातील इतर जिल्ह्यातही तिच परिस्थिती आहे. पाऊस नसल्यामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्माघाताने अनेकांचे बळी गेले आहेत. या ठिकाणची जनता देखील पावसाची वाट पाहत आहेत. अशामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम आहे. अशामध्ये देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे दिल्लीकरांची उकाड्यातून सुटका झाली आहे.

आसाम, राजस्थानमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी 142 गावांमध्ये घुसले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरामुळे 40 हजारांपेक्षा जास्त लोकं प्रभावित झाली आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच मध्य प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

SCROLL FOR NEXT