Sangli Crime News: धक्कादायक! सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! जमिनीसाठी थेट कुऱ्हाडीने मानेवर वार

Crime News: बंडू शंकर खरात (वय ५०) असे मयताचे नाव आहे.
Miraj Police Station
Miraj Police StationSaam Tv
Published On

Sangli News: सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाकडून भावाचा खून झाल्याची घटना घडली आहे. कुऱ्हाडीने मानेवर वार करुन हा खून करण्यात आला आहे. बंडू शंकर खरात (वय ५०) असे मयताचे नाव आहे. (Latest Marathi News)

रात्री ८ ते ९ च्या दरम्यान कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आलाय. हत्येनंतर आरोपी सचिन बबन खरात (वय ३०) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Miraj Police Station
Buldhana Crime News: समलैंगिक शिक्षकाचा तरुणासोबत काढला आक्षेपार्ह व्हिडिओ; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती येथे ही घटना घडलीये. खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घालण्यात आलेत. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

मिरज पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. या हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. बंडू खरात यांचा चुलत भाऊ सचिन खरात यांच्याशी जमिनीचा वाद सुरू होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला.

Miraj Police Station
Chandrapur Crime: प्रेमप्रकरणातून घडलं भयंकर! बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह; चंद्रपूरात खळबळ

अनेक घरांमध्ये जमिनीवरुन वाद होताना दिसत आहेत. हे वाद इतके विकोपाला जातात की यामध्ये नात्याचाही विचार केला जात नाही. जमिनीच्या वादातून आजवर अनेक व्यक्तींचा मृत्यू झालाय. तर अपराधी व्यक्ती अशा कृत्यांमुळे जेलची हवा खात आहेत. जमिनीच्या वादातून अशा घटना घडल्यावर यात दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी सर्वांनी मधला मार्ग काढला पाहिजे.

सांगलीमध्ये (Sangli) हत्येच्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी या बाबत म्हटलं आहे की, दोन्ही भावांमध्ये (Brother) गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. या आधी देखील त्यांच्यात हाणामारी झाली होती. सोमवारी त्याचा वाद विकोला गेल्याने हत्येची घटना घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com