Monsoon Update in Maharashtra:
Monsoon Update in Maharashtra:  Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Update in Maharashtra: बळीराजासाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत आली मोठी अपडेट; या तारखेला महाराष्ट्रात बरसणार!

Satish Daud-Patil

Maharashtra Monsoon Update: मे महिना संपण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले असून लवकरच जून महिना सुरू होणार आहे. जून महिना हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण, या महिन्यात शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करतो. यासाठी बळीराजाला मान्सूनची प्रतिक्षा असते. मान्सून लवकरच राज्यात दाखल व्हावा, अशी आशा शेतकऱ्यांना असते. (Breaking Marathi News)

अशातच मान्सूनची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून २०२३ संबंधी हवामान खात्याकडून नवे अपडेट्स जारी करण्यात आले आहेत. १९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे.(Latest Marathi News)

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.

याशिवाय १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस (Weather Updates) सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

खरंतर, मान्सून साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापतो. पण यंदा केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनचा पहिला पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT