नागपुरात पैशांच्या वादातून एकाची हत्या
कुख्यात गुंड अब्दुल रहमानची गळा चिरून हत्या
तिघांनी केली हत्या, आरोपींना अटक
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना बेड्या
नागपूरमध्ये पैशाच्या वादातून कुख्या गुंडाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तिघांनी तरुणाची गळा चिरून हत्या केली. नागपूरच्या मालधक्का रेल्वे परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने ३ आरोपींना अटक केली. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. अब्दुल रहमान असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या घटनेतील रकमेच्या वाटपावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि यातूनच हे हत्याकांड घडले. कुख्यात गुंड अब्दुल रहमानची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का रेल्वे परिसरात सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली.
हत्या करण्यात आलेला ३० वर्षीय कुख्यात गुंड अब्दुल रहमान ऊर्फ अब्दुल रज्जाक हा शांतीनगरमधील लालनगरमध्ये राहत होता. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी राहुल उईके (वय १८ वर्षे), परमेश्वर ऊर्फ पप्पू संतोष पटेल (वय १९ वर्षे) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अब्दुल रहमान, राहुल उईके, परमेश्वर पटेल आणि अल्पवयीन मुलगा हे चारही घरफोडी, चोरी आणि लुटपाट करायचे.
चारही जणांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल आणि राहुल, परमेश्वर यांच्यात चोरीच्या प्रकरणातील चार लाख रुपयांच्या रकमेवरून वाद सुरू आहे. याच वादातून राहुल आणि परमेश्वर यांनी अब्दुलच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली होती. त्यामुळे अब्दुल चिडलेला होता. यातून दोघांमध्ये मोठा वाद झाला.
हा वाद मिटवण्यासाठी सर्व जणांनी भेटायचे ठरवले. भेटायला गेलेल्या अब्दुलकडे राहुल आणि परमेश्वरने पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादानंतर अब्दुलची कटरच्या सहाय्याने गळा चिरून हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.