Solapur Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: बाळा तणावात का आहेस?, माझ्याकडे ये..., दिवंगत आई स्वप्नात आली अन् मुलानं आयुष्य संपवलं

Solapur Police: सोलापूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. दिवंगत आई स्वप्नात आली. आईने माझ्याकडे ये बोलावलं असल्याचे चिठ्ठीत लिहीत या मुलाने गळफास लावून आयुष्य संपवलं.

Priya More

Summary -

  • नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सोलापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

  • आईच्या मृत्यूनंतर मानसिक तणाव; स्वप्नात आईने बोलावल्याने टोकाचे पाऊल

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मामा व आजीचे आभार

  • पुण्यात राहत असलेला हुशार विद्यार्थी मामाकडे राहत होता, ९२ टक्के गुण

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जुळे सोलापूर भागातील म्हाडा कॉलनीमध्ये ही घटना घडली. एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवशरण भुताळी तळकोटी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आधी पुण्यातील केशवनगरमध्ये राहत होता. पण आईच्या निधनानंतर तो सोलापूरमधील म्हाडा कॉलनीमध्ये मामाच्या घरी राहत होता.

पुण्यातील कोंडवा येथे शिक्षण घेतलेल्या शिवशरणला दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळाले होते. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील एका खासगी शिक्षण संस्थेत जेमतेम वेतनावर काम करत आहेत. तर ३ महिन्यांपूर्वी आईचे काविळीमुळे निधन झाले होते. शिवशरण हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे मातृछत्र हरवलेल्या शिवशरणला मामा महादेव तोळनुरे यांनी पुढील शिक्षणासाठी सोलापूरमध्ये आपल्या घरी आणले. जुळे सोलापुरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात त्याला प्रवेश दिला. खासगी कोचिंग क्लासेसही लावले.

आईच्या अचानक जाण्याने शिवशरण खूपच दु:खात होता. तो मानसिक तणावात गेला होता. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि बुधवारी दुपारी मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी शिवशरणने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये आपल्या मृत्यूला कुणालाही दोषी धरु नये असे नमूद केले आहे.

शिवशरण रोज पहाटे शिकवणीला जायचा. तो राहत असलेल्या घरात दोन मुले होते. त्याचे मामा अक्कलकोट येथे नोकरी करत होते. काल सकाळी नेहमीप्रमाणे तो मामाशी फोनवर बोलला. अभ्यास चांगला सुरू असल्याचे सांगितले. मात्र दुपारी त्याने घरातच फॅनला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शिवशरणच्या पश्चात त्याचे वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. हे सर्व जण पुण्यात असतात. त्याने आत्महत्या केल्यामुळे कुटु्ंबीयांना मोठा धक्का बसला.

शिवशरणने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

मी शिवशरण. मी मरत आहे.. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा आणि आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे... आई काल स्वप्नात आली होती.'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये...'असे म्हणत तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा....मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस. त्याबद्दल धन्यवाद.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

Viral Video : दबक्या पावलांनी आला पण, शिकारी हातातून सटकला; बिबट्याच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

SCROLL FOR NEXT