Subramanian Swamy Today News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत असं धक्कादायक विधान भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक आहे असं म्हणत त्यांनी भाजपला (BJP) घरचाच आहेर दिला आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. (Pandharpur Latest News)
सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत असं म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली आहे. (Latest Marathi News)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान भाजपला त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.