Modi Govt Cabinet Expansion Saam Tv
महाराष्ट्र

Modi Govt Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार मंत्रिपदे?

मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार मंत्रिपदे?

साम टिव्ही ब्युरो

>> प्रमोद जगताप

Modi Govt Cabinet Expansion: राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. यात महाराष्ट्राच्या वाटेलाही दोन मंत्रिपद येऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि नव्याने राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाला एक-एक केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 3 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा केंद्रीय सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे. यातच केंद्रातील काही मंत्र्यांना डच्चू मिळू शगकतो, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. (Latest Marathi News)

याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचाही होऊ शकतो विस्तार?

दरम्यान, मागील आठवड्यात अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता या आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबाबत काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली होती. इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, असंही शिंदे म्हणाले होते.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ''तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होईल. यात इच्छुक आमदारांना संधी दिली जाईल.'' नेमका कधी होणार हा मंत्रिमंडळ विस्तार, असं त्यांना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की, ''एक आठवड्याच्या आत मंत्रिमंडळ विस्तार होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT