Beed Tree Cutting
Beed Tree CuttingSaam Tv

Beed Tree Cutting: बीड जिल्ह्यात सर्रास वृक्षतोड; तक्रार करून देखील वनविभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

Bead News: बीड जिल्ह्यात सर्रास वृक्षतोड; तक्रार करून देखील वनविभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप
Published on

Beed Tree Cutting: एकीकडे शासन कोट्यवधी रूपये वृक्षलागवड व संगोपनासाठी खर्च करत असताना, दुसरीकडे बीडच्या कानडीघाट येथे सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे.

याविषयी ग्रामस्थांनी 25 वर्षांपूर्वीची झाडे तोडल्याची लेखी तक्रार देऊन 3 दिवस झाले आहेत. तरी वनविभागातील अधिकारी, कर्मचारी साधा स्थळपंचनामा करण्यासाठी सुद्धा आले नाही. यातच वनविभागातील आधिकारी वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे..

Beed Tree Cutting
LIC Pension Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल पेन्शन

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या कानडीघाट येथील शेतकरी लक्ष्मण ज्ञानोबा कवडे आणि हनुमंत ज्ञानोबा कवडे यांनी 6 जुलै रोजी त्यांच्या शेतातील 25 वर्षे वयोमान असणारी चिंचेची व कडुनिंबाची 10 झाडे विनापरवानगी तोडण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

याबाबत संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार जिल्हाधिकारी,वन विभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना केलीय. मात्र 3 दिवस झाले तरी कोणीही स्थळपंचनामा व चौकशीसाठी आले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Beed Tree Cutting
West Bengal Panchayat Election 2023: पश्चिम बंगाल निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार आणि स्फोट; आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू

दरम्यान मराठवाड्यात बीड आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र असून बीड जिल्ह्यात केवळ 2.5 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व वृक्षसंगोपन करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. मात्र त्याठिकाणी केवळ फोटोसेशन व जाहिरात बाजी करुन दिशाभूल केली जाते. याचवेळी वृक्षतोडीची लेखी तक्रार देऊनही दखल न घेणाऱ्या वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com