DELIMITATION BILL 2026 saam tv
महाराष्ट्र

डिलिमिटेशनच्या चाव्या पवार- डिएमकेच्या हाती? इंडिया आघाडीत फूट पडणार?

Delimitation Bill: केंद्रीय कॅबिनेटनं डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिलीय. कोणाच्या जोरावर मोदी सरकारनं हे बिल मांडायचं ठरवलंय? कोणाच्या हातात हे बिल मंजूर करण्याच्या चाव्या आहेत? कोणाचं भाजपसोबत सूत जुळलंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....

Suprim Maskar

केंद्र सरकार संसदेत दुसऱ्यांदा डिलिमिटेशन बिल मांडणार असल्याचं आता स्पष्ट झालयं...कारण केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान संसदेचं अधिवेशन बोलणार असल्याची घोषणा केलीय...इतकचं काय तर कॅबिनेटनं डिलिमिटेशन बिलाला मंजुरीही दिलीय. मोदी सरकारनं डिलिमिटेशन बिल लोकसभेत पुन्हा मांडून मंजूर करून घेण्यासाठी पूर्ण ताकद लावल्याचं दिसतंय. त्यामुळे काँग्रेससमोर भाजपला रोखण्याचं आव्हान आहे.

17 एप्रिल 2026 ला डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात झालं होतं. त्य़ामुळे आता भाजपनं या विधेयकात काही नव्या तरतुदी केल्या आहेत. कारण डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंब्यासाठी प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्याची अट ठेवली होती. आता ही नव्या विधेयकात ही तरतूद करण्यात आलीय. त्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्ये फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.

संसदेत झालेल्या मतदानावेळी डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूनं एनडीएची 298 मते तर विरोधात इंडिया आघाडीची 230 मतं पडली होती. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षफुटीनंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आणि ठाकरेसेनेचे 6 खासदार फुटल्यानं एनडीएचं संख्याबळ 324 वर पोहचलं. मात्र, आता डिलिमिटेशनला पाठिंबा देण्यासाठी डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सशर्त अनुकूलता दर्शवल्याची चर्चा आहेत. त्यामुळे डीएमकेचे 22 खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर एकूण संख्याबळ 354 इतकं होईल. मात्र, दोन तृतीयांश बहुमत गाठण्यासाठी एनडीएला आणखी 6 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

मात्र संविधान दुरुस्ती नियमानुसार जर संसदेत मतदानावेळी सभागृहात 529 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास सरकारचा विधेयक मंजूर करण्याचा मार्ग आणखी सुकर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशातील सात पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत...

YSRCP- 4

आप - 3

एमआयएम- 1

अकाली दल (WPD)- 2

यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL)- 1

जोरम पीपल्स मुव्हमेंट- 1

इंजिनीअर राशिद- 1

हे सात पक्ष एनडीएला पाठिंबा देतात का? यावर विधेयक मंजूर होणार की नाही? हे ठरणार असल्याचं दिसंतय. ...

दरम्यान प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडाळानं मंजुरी दिलीय... त्यामुळे 50 टक्के जागा वाढवल्यास महाराष्ट्रात खासदारांच्या किती जागा वाढू शकतात ते पाहूयात...

महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून 72 वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन मतदारसंघामागे एक मतदार संघ वाढणार. सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 17 लाख मतदार आहेत. मात्र, 24 जागा वाढल्यास एका मतदारसंघातल्या मतदारांची सरासरी संख्या 12 ते 13 लाखापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

एकंदरित केंद्रीय कॅबिनेटमध्ये राज्यात 50 टक्के जागा वाढवण्याच्या निर्णय घेऊन केंद्रानं प्रादेशिक पक्षाना खुश करत डिलिमिटेशनचं जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केलाय़...तर दुसरीकडे गेल्यावेळी विरोधात मतदान करणाऱ्या इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांना सोबत ठेवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यामुळे गेल्यावेळचीच पुनरावृत्ती होणार की भाजप यावेळी डिलिमिटेशन बिलाची नैय्या पार करणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJPचे सर्व आमदार 25 दिवस गावोगाव फिरणार; 71,000 मतदान केंद्रांना भेटी, भाजपचं काय आहे नवं अभियान?

कुत्र्याची दहशत, तरुणाला हार्ट अटॅक, भटक्या कुत्र्याचा हल्ला बेतला जीवावर

AIमुळे 2 कोटी 40 लाख नोकऱ्या जाणार? जेपी मॉर्गनच्या दाव्यानं खळबळ

जरांगे सुपारी घेऊन काम करतात; मंत्र्याचा खळबळजनक आरोप, शिंदेसेनेचे नेतेच शिंदेंना खाली नेणार, जरांगेंचा पलटवार

पवारांच्या राष्ट्रवादीचा खासदारांना व्हीप जारी, डिलिमिटेशन बिलावरून मविआत फूट? राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT