MNS Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचा ग्राऊंड रिपोर्ट; मंत्री रविंद्र चव्हाणांच्या दाव्याची पोलखोल, पाहा VIDEO

MNS on Mumbai-Goa Highway : रविंद्र चव्हाण यांच्या घोषणेचा पर्दाफाश मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai-Goa Highway News :

गणोशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील कोकणी माणसाची पावलं हळूहळू गावाकडे वळू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आश्वासनामुळे आपला प्रवास सुखकर होईल, ही आशा नागरिकांमध्ये होती. मात्र यंदाही खराब रस्त्यांचं विघ्न कोकणवासियांच्या समोर आहेच.

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची एक लेन सुरु केली, अशी महिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र रविंद्र चव्हाण यांच्या घोषणेचा पर्दाफाश मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे.

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर योगेश चिले यांनी केलेल्या ग्राऊंड रिपोर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने ट्वीटमध्ये म्हटलं की, गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची एक लेन सुरु केली, अशी आरोळी ठोकणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दावे किती खोटे आहेत हे पाहा. गणपतीसाठी चाकरमानी कोकणात जाताना काय हालअपेष्टा सहन करणार आहे ह्याचं वास्तव दाखवणारा मनसे प्रवक्ते योगेश चिले ह्यांचा ग्राऊंड रिपोर्ट. (Latest Marathi News)

योगेश चिले यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं की, मी आता संगमेश्वरपासून ५ किमी अंतरावर आहे, इथून राजापूर येथे निघालो आहे. गणपतीआधी मुंबई-गोवा हायवे एक लेन सुरु करु, अशी घोषणा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. (Political News)

मी या रस्त्यावर आहे, मला संगमेश्वरपासून ही सिंगल लेन कुठेच दिसली नाही. चिपळूणपासूनही मधे-मधे सिंगल लेन आहे. तर काही ठिकाणी ती गायब आहे. इतकं काम बाकी आहे की दोन महिन्यातही हे काम पूर्ण होणार नाही. मग मंत्री महोयदयांनी कुठल्या भरवश्यावर गणपतीआधी रस्ता सुरु करण्याचा दावा केला हे आम्हाला कळत नाही, असं योगेश चिले यांनी म्हटलं.

आपण मंत्री झालात की लोकांना आवडतील अशा घोषणा करणं खूप सोपं असतं. पण वस्तुस्थिची विचार न करता घोषणा केल्या तर काय हालत होते हे तुम्हाला कळेल. मात्र गणेशोत्सवात या मार्गावर कोणतंही अघटित घडू नये ही प्रार्थना, असं योगेश चिले यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT