December 31 auspicious day: नववर्षापूर्वी मिळणार शुभ संकेत! ३१ डिसेंबरचा दिवस कोणासाठी फायदेशीर?
आज ३१ डिसेंबर असून हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने अनेक जण आत्मपरीक्षण, पुढील नियोजन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याकडे कल ठेवतात. आज चंद्र मेष राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, धाडस आणि पुढाकार घेण्याची भावना वाढलेली पाहायला मिळतेय. आजचं सविस्तर पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त आणि आजचा दिवस कोणत्या चार राशींना अनुकूल आहे ते पाहूयात.
आजचं पंचांग
तिथि – शुक्ल द्वादशी
नक्षत्र – कृतिका
करण – बव
पक्ष – शुक्ल पक्ष
योग – साध्य (रात्री ०९:१४:०९ पर्यंत)
दिन – बुधवार
सूर्य एवं चंद्र गणना
सूर्योदय – 07:04:28 AM
सूर्यास्त – 05:36:09 PM
चंद्र उदय – 02:21:33 PM
चंद्रास्त – 03:32:27 AM
चंद्र राशि – मेष
ऋतु – हेमंत
हिंदू मास एवं वर्ष
शक संवत् – 1947
विक्रम संवत् – 2082
माह (अमान्ता) – पौष
माह (पूर्णिमान्ता) – पौष
अशुभ मुहूर्त
राहुकाल – 12:20:18 PM ते 01:39:16 PM
यमघंट काल – 08:23:25 AM ते 09:42:23 AM
गुलिकाल – 11:01:20 AM ते 12:20:18 PM
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त – 11:59:00 AM ते 12:41:00 PM
या राशींसाठी वर्षाचा शेवटचा दिवस ठरणार लकी
मेष रास
चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढलेला राहणार आहे. नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे निर्णय किंवा पुढील वर्षाचे नियोजन करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कामात गती येईल.
सिंह
कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्वगुण आज ठळकपणे दिसून येणार आहेत. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. आर्थिक बाबतीत समाधानकारक घडामोडी होतील.
धनु
नवीन कल्पना आणि संधी तुमच्यासाठी उघडणार आहेत. शिक्षण, प्रवास किंवा वैयक्तिक विकासाशी संबंधित निर्णय आज फायदेशीर ठरू शकतात.
कुंभ
मित्रपरिवार आणि सामाजिक संपर्कातून लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यातील योजनांबाबत स्पष्टता येणार आहे. आज केलेले प्रयत्न पुढील काळात चांगले परिणाम देणारे ठरतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

