Raj thackeray  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार; राज ठाकरे यांनी केली घोषणा

, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र्य लढणार असल्याची घोषण केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray News : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक पक्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र्य लढणार असल्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, 'महालक्ष्मीचं दर्शन घेऊन कोकणचा दौऱ्याला उद्यापासून सुरुवात करणार आहे. उद्या सकाळी १० च्या सुमारास देवीचं दर्शन होईल. त्यानंतर रस्त्यात तांबडा पांढरा मिळाला तर खाईन'.

'आमची रणनीती ही आहे, असं उत्तर कुणी दिली आहे का ? कोल्हापुरातून बाहेर गेल्यावर पदाधिकाऱ्यांसोबत बैठका आहेत. त्यांच्यासोबत बोलून पुढची पावलं उचलणार आहे. निवडणुकीची रणनीती हीच समजावी. बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलत राहतील. मी माझ्यासाठी काम करतो. त्यांच्यासाठी काम करत नाही. माझ्या पक्षासाठी काम करतो. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांना करू द्या, असं प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी आरोप करणाऱ्या विरोधकांना दिले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, 'मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहे. माझ्या पक्षाला सोळा सतरा वर्षे झाली. भाजपच्या हातात २०१४ मध्ये सत्ता आली. १९५२ साली भाजप आणि शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली. त्यांना १९८५ साल उजाडावं लागलं, मुंबई महापालिका हाती यायला'.

'सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा वर येतो? काही गोष्टींकडून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न होतोय का? याचा पत्रकार म्हणून तुम्हीही शोध घेतला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. 'त्या माणसाबद्दल काय बोलावं? त्या पदावर आहेत म्हणून सोडून देतो. पद येतं पण पोच येत नाही, त्यातली ही माणसं आहेत. कधी कुठची कोणती गोष्ट बोलावी ? यांना पण कुणी स्क्रीप्ट देतं का ? लक्ष वळवण्यासाठी दुसरीकडे....सरकारला काही गोष्टी विचारल्या जाऊ नयेत, यासाठी हे सगळे प्रयत्न असतात'.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं का? लोक सांगत होते आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे. त्यावेळी भेटत नव्हते. आता काही प्रॉब्लेम नाही. सगळं व्यवस्थित आहे का? आरोग्यात सुधारणा व्हावीच.

'तेव्हा भेटी टाळत होते, पण आता बरोबर सगळं सुरळीत आहे. दौरै सुरू झाले. तेव्हा लोकांना भेटला का नाही ? कोविडचं कारण सांगितलं, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT