CM Uddhav Thackeray and Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेच शिवसेनेत राहणार? मनसे नेत्याची खरमरीत टीका

महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे राजकीय मैदानात उतरले आहेत. शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांची बैठक नुकतीच पार पडली. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनेही निष्ठा यात्रा सुरु केली आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरुनही राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेच शिवसेनेत राहतायत की काय ? अशी चिंता महाराष्ट्राला लागली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना राष्ट्रवादीत पाठवलं तरी निष्ठा यात्रा काढायची गरज पडणार नाही, असं म्हणत काळे यांनी हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेवर टीका करताना काळे म्हणाले, शिवबंधन झालं, आता प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं तरीही आमदार थांबत नाहीत. नगरसेवक पण थांबत नाहीत. आता आदित्य ठाकरे यांना साखळदंडाने बांधून ठेवलं तर ते जाणार नाहीत, याची काळजी उद्धव ठाकरेंनी घ्यावी. शिवसेनेने आता भोंगा हे निवडणूक चिन्ह घ्यावे, म्हणजे पाच वेळा जशी बांग होते, त्याद्वारे नवाब सेना असे ऐकू येईल, अशी खरमरीत टीका काळे यांनी शिवसेनेवर केली आहे.

शिवसेना नेमकी कुणाची ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांची की, एकनाथ शिंदे गटाची ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडले आहेत. शिवसेनेचं अधिकृत चिन्ह शिंदे गटाला मिळणार का, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. परंतु शिवसेनेच्या चिन्हाबाबत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी मोठं विधान केलं आहे. धनुष्यबाण हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा आहे. तो बंडखोरांचा नाही. धनुष्यबाण (Bow and Arrow) आणि शिवसेनेचं नातं कोणीही तोडू शकत नाही. धनुष्यबाण फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

शिवसेनेची भूमिका मांडताना विनायक राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले , धनुष्यबाण हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा तो बाडग्यांचा नाही. धनुष्यबाण आणि शिवसेनेचं नातं कोणीही तोडू शकत नाही. तो फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा. काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न केलेल्या विधानाबाबच मीडियात बातम्या झळकल्या. याद्वारे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT