Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: लोकसभेनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर; मनसेने बोलवली महत्वाची बैठक, पुढील रणनिती काय ठरणार?

Rohini Gudaghe

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. १३ जूनला राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ,नेत्यांची, विभाग प्रमुखांची आणि शहर प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच १३ जून रोजी राज ठाकरे यांच्या कार्यकारिणीची निवडणूक देखील होणार आहे.

राज ठाकरेंनी १३ जून रोजी सकाळी रंगशारदा येथे मनसे नेते, सरचिटणीस, लोकसभा संघटक, उपाध्यक्ष, राज्यसचिव, प्रवक्ते मुंबईतील महिला-पुरुष विभागअध्यक्ष, महिला-पुरुष जिल्हाअध्यक्ष, उपजिल्हाअध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहरअध्यक्ष (महानगर पालिका क्षेत्र), उपशहर अध्यक्ष आणि सर्व अंगिकृत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली (Assembly Election) आहे.

लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे आता विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचा अंदाज आहे. आता या बैठकीमध्ये नेमकं काय होणार, मनसेची पुढील रणनिती काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

दादर माटुंगा कल्चरल हॉल येथे मनसेची निवडणूक १४ जून रोजी होणार (Raj Thackeray MNS Meeting On 13 June) आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पहिल्यांदाच ऑन कॅमेरा होणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे निवडणूक आयोगाकडून ऑन कॅमेरा निवडणूक घेण्यास मनसेला सांगितलं आहे. यापूर्वी ऑफलाइन निवडणूक प्रक्रिया व्हायची, परंतु आता ऑन कॅमेरा घेण्यात येणार आहे. या निवडणुकीला राज्यातील मनसे पदाधिकारी असतील. ही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT