पूरात सापडलेल्यांना शक्य तितकी मदत करा: राज ठाकरे आवाहन
पूरात सापडलेल्यांना शक्य तितकी मदत करा: राज ठाकरे आवाहन saam tv
महाराष्ट्र

पूरात सापडलेल्यांना शक्य तितकी मदत करा: राज ठाकरे आवाहन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जून (June) महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने (Monsoon) जुलैमध्ये (July) राज्यात पुन्हा आपला धुमाकूळ सुरु केला आहे. कोकणासह (Kokan) पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) पुर आला आहे. सिंधूदुर्ग, चिपळून, रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या संकटात सापडलेल्या लोकांना शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. (Help the flood victims as much as possible)

काय म्हटंल आहे राज ठाकरे यांनी

''महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर - परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत: ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये,'' अशा शब्दाच राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना आवाहन केले आहे.

दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने पूर आला आहे. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर सिंधुदुर्गातील पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून पाणी गाव आणि शेतशिवारे पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. याव्यतिरिक्त पुण्यासह सातारा,अकोला, बुलढाणा,या जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT