Raj Thackeray Claim On Wani Legislative Assembly Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मनसेच्या भूमिकेने महायुतीचं टेन्शन वाढलं; पदाधिकाऱ्यांचा वणी विधानसभेवर दावा, भाजपच्या गोटात अस्वस्थता

Raj Thackeray Claim On Wani Legislative Assembly Constituency: वणी विधानसभेवर मनसेने दावा केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे.

Rohini Gudaghe

संजय राठोड, साम टीव्ही, यवतमाळ

दोन दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २० जागांवर दावा केला आहे. त्यात यवतमाळच्या वणी विधानसभेचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. या राजकीय घडामोडीमुळे अनेक पातळीवर भाजप आणि मनसे या दोन पक्षात संघर्षाची ठिगणी पेटण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदार संघावर मनसेने दावा केला असला, तरी हा मतदार संघ कुणाच्याही वाट्याला न जाता तो भाजपकडेच कायम राहील, असे वणीचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला (Maharashtra Politics) आहे. त्यामुळे आता वणी विधानसभेत भाजप विरूद्ध मनसे अशी लढत होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसेला वणी विधानसभेची जागा देणार नाही. वणी विधानसभा भाजपचा बालेकिल्ला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये सलग भाजपचा विजय झालेला आहे. लोकसभेत आम्ही मागे पडलो, कमी मतं मिळाली. याचा अर्थ मनसेला ती जागा (Wani Legislative Assembly Constituency) सोडावी, असा होत नाही. मनसेसोबत आमची युती नाही. राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना पाठिंबा फक्त स्टेजपुरता राहिला. खाली उतरला नसल्याची टीका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

आमचा मनसेला पाठिंबा नाही. त्यांना वणीची जागा शंभर टक्के मिळणार नाही. वरिष्ठांना आमची भूमिका पटवून देत आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे वणी विधानसभा भाजपशिवाय दुसरा कुणी लढणार नाही, असा विश्वास त्यांनी (bjp) व्यक्त केला आहे.

मनसेने (MNS) राज्यात विधानसभा महायुतीसोबत लढण्याची शक्यता असल्याचं समोर आलं आहे. तर राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीकडे २० जागांसाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे. या वीस जागांमध्ये वणी विधानसभेचा देखील समावेश आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागा मुंबई, पुणे आणि नाशिकमधल्या आहेत. यात मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वरळी, माहीम, शिवडी, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT