Amol Mitkari Saam Digital
महाराष्ट्र

Amol Mitkari vs MNS : राज ठाकरेंना 'सुपारीबाज' म्हणणाऱ्या अमोल मिटकरींची कार फोडली; अकोल्यातील वादाचा VIDEO समोर

MNS Crush Amol Mitkari Car : अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना नाव न घेता सुपारीबाज म्हटलं होतं. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. अशातच मनसैनिकांकाडून अमोल मिटकरींची कार फोडण्यात आल्याचे समोर आले आहे.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं थेट नाव न घेता राज ठाकरेंनी केलेल्या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनीही अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणून संबोधित केले. यावरून मनसे आणि राष्ट्रवादीत मोठा वाद झाला. मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून, अकोल्यात अमोल मिटकरी यांची कार फोडली.

काल राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पुण्यात नसून धरण भरले अशी टीका अजित पवारांवर केली. त्यानंतर अमोल मिटकरींनी राज ठाकरे सुपारीबाज नेते आहेत, त्यांची विश्वासर्हता संपली आहे असं म्हटलं होतं. त्यामुळेच मनसे आणि राष्ट्रवादीत आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी, अशा हल्लांना आम्ही भिक घालत नाही, असे प्रकार करून करुन महायुतीत सत्तेत येऊ शकतो, असं वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, अशी टीका केली आहे.

अनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर NCP च्या मिटकरीची कार फोडली आहे. मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. त्यांनी माझ्यावर हल्ला अचानक हल्ला केला. मात्र, असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं.

पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या एकतानगर आणि सिंहगड रोड भागाचा दौरा केला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरं यांचं नाव न घेता त्यांचा सुपारीबाज असा थेट उल्लेख केला होता. टोल नाक्याचं आंदोलन, भोंग्याचे आंदोलन किंवा आणखी कोणतं आंदोलन असेल सुपारीबाजांच्या कोणत्याच आंदोलनाला यश आलेलं नाही. त्यांना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही, हाच राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजित पवारांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा असल्यांचा टोला लगावला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT