मराठी भाषेवरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. जो महाराष्ट्रात राहतो, त्याला मराठी भाषा आली पाहिजे. ज्याला मराठी येणार नाही त्याच्या कानाखाली बसणार , असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यातून दिलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मेळावा शिव पार्कावर पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषा मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषेवरून आक्रमक होत राज ठाकरेंनी मराठी न बोलणाऱ्यांना परप्रांतीयांना दम भरलाय.
आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते. आजच्या मराठी नववर्षांच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ.
जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले. मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं का नाही झाली कर्जमाफी ? असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.