
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पर्यावरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. सरकारच्या नाकारर्तेपणामुळे आज देशातील नद्या मृत पावत आहेत. राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नद्यांची दयनीय स्थिती दाखवली.
आपल्या देशात नद्यांना (River) आई म्हटलं जातं. परंतु आपल्याच देशात नद्यांची अवस्था वाईट आहे. यावेळी राज ठाकरेंनी गंगा नदीचं वास्तव दाखवणारे व्हिडिओ दाखवला. गंगेची भयान स्थिती असल्यानेच आपण गंगेचं पाणी पिण्यास नकार दिला होता असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मुंबईतही ५ नद्या होत्या. पण राजकीय नेत्यांच्या नाकारर्तेपणामुळे मुंबईतील पाचपैकी ४ नद्यांना मारण्यात आलं. त्याकडे कोणी पाहिलं नाही.
पाचवी आणि अखेरची नदी आहे. ती नदी आहे, मिठी नदी. परंतु त्या नदीची स्थितीही वाईट असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यांनी नदीचं भयाण वास्तव व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकलीय.
दरवर्षी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मिठी नदी साफ करणार असं म्हणतात, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाहीये. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की, आपण म्हणणार धर्माच्या आड येतो, असं राज ठाकरे म्हणाले. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असा, संदेश दिला जातो. देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होत असतात.
मग लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच येतात ना? विद्युतदाहिन्या आल्या आहेत, पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. प्राण्याची आवड आहे, मग प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवलं पाहिजे,असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
राजीव गांधी पंतप्रधान असताना गंगा साफ केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही गंगा साफ करण्याची घोषणा केलीय. तेव्हापासून गंगा साफ केली जातेय. पण अजून गंगा साफ झाली नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टॅन्डर्सनुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अतिशय वाईट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.