Sandeep Deshpande
Sandeep Deshpande  Saam Tv
महाराष्ट्र

माझी पत्नी आणि मुलगा घरी आहे, पोलिसांना एवढेच सांगतो...; संदीप देशपांडेंची Video पोस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मनेसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलीस देशपांडे यांचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर करुन शिवतीर्थावरील घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडिओत देशपांडे म्हणाले, महिला पोलीस अधिकाऱ्यांना आमचा स्पर्श सुद्धा झाला नाही. असं असतानाही आम्ही महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली किंवा आमच्या धक्क्याने त्या पडल्या. अशाप्रकारचे आरोप आमच्यावर का केले जात आहेत ? पोलीस निरीक्षक कासार यांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाजूला तेव्हा सात-आठ पोलीस अधिकारी होते. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि संतोष धुरीला पकडण्याचा प्रश्नच येत नाही. घडलेला घटनाक्रम सीसीटीव्हीत (cctv footage) कैद आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांच्या घराबाहेरील कॅमेरे खोटं बोलणार नाहीत.जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. पण खोटे गुन्हे दाखल करणार असला तर मी सहन करणार नाही. माझी पोलिसांना (Mumbai Police) विनंती आहे. माझी बायको घरी असते आणि ६ वर्षांचा मुलगा असतो. पुरुष पोलीस म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता घुसण्याचा प्रयत्न करता, ते कृपया करु नका.

व्हिडिओत काय म्हणाले संदीप देशपांडे?

आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो. मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतो. संजय राऊतांच्या विरोधात बोलतो. आम्ही जेलला घाबरत नाही. आम्ही पोलीस कस्टडीला घाबरत नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. ज्या ज्या वेळेला आंदोलनं केली त्या त्या वेळेला हजर झालोय. पण अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार असला तर मी सहन करणार नाही. माझी पोलिसांना विनंती आहे. माझी बायको घरी असते आणि ६ वर्षांचा मुलगा असतो. पुरुष पोलीस म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता घुसण्याचा प्रयत्न करता, ते कृपया करु नका. पोलिसांत पोलिसांसारखे वागा. मी घरी नाहीये. मी कायदेशीर सल्ला घेतोय. कायदेशीर सल्ल्यानुसार मी वागेल आणि किती दिवस मला जेलमध्ये ठेवणार ? मी त्या गोष्टीला घाबरत नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहे. खोटे गुन्हे मी सहन करणार नाही. माझा न्यायालयावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Nashik Loksabha: फक्त १ मिनीट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार... बंडखोर अनिल जाधवांमुळे नेते कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

Headphone: सतत हेडफोन वापरण्याची सवय ठरू शकते धोकादायक

Tips for Healthy Hair : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतेल 'या' फळांचे सेवन

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

SCROLL FOR NEXT