Bala Nandgaonkar News  Saam Tv News
महाराष्ट्र

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Bala Nandgaonkar News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांचे अतिशय विश्वासू सहकारी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी साम टिव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Prashant Patil

मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख यांनी हिंदी सक्तीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचदरम्यान, महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांचे अतिशय विश्वासू सहकारी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी साम टिव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरुन आणि मराठी माणसाच्या एकत्रीकरणावरुन त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'ठाकरे बंधूंपासून सगळ्यांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे. मराठी संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही संघटना आहे. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणूस भविष्यात एकत्र राहिला पाहिजे', असं मत नांदगावकर यांनी मांडलं आहे.

'राज्यात राज्यकर्ते हे मराठीच आहेत, तरीही राज्यात वेगवेगळ्या घटना घडतायत. इतर भाषिकांचा आम्ही सन्मान करतो', असंही नांदगावकर यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, 'एकदा राज ठाकरेंची मुलाखत अर्णब गोस्वामी यांनी घेतली होती. गोस्वामी यांनी राज साहेबांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले, पण राज ठाकरेंनी त्यांना मराठीत उत्तर दिलं. त्यानंतर त्यांना राजसाहेब यांनी सांगितलं होतं की, 'तुम्हाला मराठी येत असून, समजत असून तुम्ही ही मुलाखत घेतली, म्हणजे मराठी येत असून तुम्ही बोलत नाही, त्याचा विचार केला पाहिजे', असंही नांदगावकरांनी यावेळी सांगितलं.

बाळा नांदगावर यांना ५ जुलैच्या मेळाव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'हा जो मेळावा आहे, त्यात दोन वेगवेगळे पक्ष आहेत. ते एका विषायपुरता एकत्र आले आहेत. एकत्र येण्याचा निर्णय जरी आमचा सगळ्यांचा असला तरी दोघं एकत्र येणं याचा अधिकार त्या-त्या पक्षप्रमुखांचा आहे. मुळात मराठी माणूस आस लावून बसलाय की, दोन भाऊ एकत्र आले पाहिजे', असंही बाळा नांदगावकर यांनी यावेळी बोलून दाखवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT