ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

Bala Nandgaonkar Interview: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा आहे. पण हे दोघे मराठी भाषेच्या मुद्द्यावरच एकत्र राहणार का? किंवा भविष्यातही दोघे बंधू एकत्र येतील, याबाबत सर्वसामान्यांपासून राजकारणातील व्यक्तींच्याही मनातला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलंय.

महाराष्ट्रात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतकेच काय तर महाराष्ट्रातील कॉमन मॅनलाही या चर्चेत प्रचंड रस आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यायला हवं, असा एक मतप्रवाह आहे, तर दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याला काहींचा विरोध होत आहे. दुसरीकडं पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याच्या जीआरला राज ठाकरेंनी विरोध केला. उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विरोध करू लागली. याविरोधात मुंबईत मराठी माणसांना एकत्रित आणून दोन्ही पक्षांकडून मोर्चाही काढण्यात येणार होता. मात्र, राज्य सरकारनं हिंदी संदर्भात काढलेले दोन्ही जीआर रद्द केले. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी विजयी मेळावा एकत्रित होणार आहे. मराठी माणसांनी या मेळाव्याला एकत्रित यावे, असं आवाहन करण्यात येत आहे. आता ५ जुलैच्या मेळाव्यापुरतेच हे दोन्ही नेते एकत्र येणार की भविष्यात निवडणुका आणि राजकारणातही एकत्र राहणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे.

ठाकरे बंधूंपासून संबंध मराठी माणसानं विचार केला पाहिजे की बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या विचारधारेचे दोन पक्ष निघाले. मराठी भाषा आणि संस्कृती, अस्मिता याचं रक्षण करणारे हे दोन्ही पक्ष आहेत. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. मराठी भाषा या मुद्द्यापुरता मर्यादित विषय आहे. तेवढं मर्यादित राहायला हवं का तर तसं नाही असं सांगतानाच भविष्यात या दोन्ही नेत्यांनी एकत्र राहायला हवं, असं सूचक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं.

मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. अस्तित्व टिकलं पाहिजे आणि मराठी माणूस या नाळेसोबत जोडलेला आहे. तो खंबीरपणे एकत्र राहायला पाहिजे. मराठी भाषा आपली आहे, ती जपली पाहिजे, असंही नांदगावकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com