MNS Avinash Jadhav on Badlapur Crime Saam TV
महाराष्ट्र

Badlapur Crime: चौकशी कसली करताय, त्याचा एन्काऊंटर करा; बदलापुरातील घटनेनंतर मनसे नेता संतापला

MNS Avinash Jadhav on Badlapur Crime : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची चौकशी कसली करताय त्याचं थेट एन्काऊंटर करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली.

Satish Daud

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी करत बदलापूरकर थेट रस्त्यावर उतरले. यावेळी संतप्त नागरिकांनी थेट बदलापूर रेल्वेस्थानकावर धडक दिली.

त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या आरोपीची चौकशी कसली करताय त्याचं थेट एन्काऊंटर करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केली. साम टीव्हीसोबत बोलताना अविनाश जाधव यांनी घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला.

अविनाश जाधव म्हणाले, खरेतर असे कृत्य केल्यानंतर आरोपीचं एन्काऊंटरच केलं पाहिजे. आमच्या चिमुकल्या मुलींवर हात टाकायची यांची हिंमत तरी कशी होते. त्यांच्या मनात असा विचार तरी कसा येतो? आपल्या देशात काय आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी विचारला आहे.

पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, यापुढे असं करण्याची कुणाची हिंमत होऊ नये यासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजे. यांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एका वर्षाच्या आत आरोपींना फासावर लटकलं गेलं पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे, असंही अविनाश जाधव म्हणाले.

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार

या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे. दोषींना अजिबात माफी नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

SCROLL FOR NEXT