- रणजीत माजगावकर
Kolhapur MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) कोल्हापूर (kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रातनिधिक स्वरूपातला विश्वकरंडक (world cup) प्रदान केला. यावेळी पोलीस (kolhapur police) आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये (kolhapur mns karylarta) झटापट झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला. (Breaking Marathi News)
पी एम किसान योजनेच्या कामाचे नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमून दिल्यानंतर देखील जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये पुरस्कार वादाचा श्रेयातून अहंकार निर्माण झालेला आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तिन्ही विभागांनी एकत्रित काम केले, मात्र पुरस्कार घेण्यासाठी केवळ जिल्हाधिकारी गेले.
याच भावनेतून पीएम किसान योजनेचा पुरस्कार घेण्यासाठी फक्त कृषी विभागाचे अधिकारी गेले. या विभागांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने याचा परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांवर व्हायला लागलेला आहे. या तिन्ही विभागाचे अधिकारी आपल्या कामांसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावत आहेत.
पुरस्कारांसाठी हापापलेल्या या अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने विश्वचषक पुरस्कार देण्याचे अभिनव आंदोलन (aandolan) करण्यात आलं. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास विरोध केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत शिरले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
तरीही हे कार्यकर्ते उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांना हा विश्वचषक पुरस्कार देण्याचा प्रयत्न केला यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली.
हे निवेदन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना मनसेने दणका दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास सुरुवात केली. यावेळी मनसेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांना निवेदन देण्यात आलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.