महाराष्ट्र

MNS Gudi Padawa Melava: गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणावर तोफ डागणार?

MNS Raj Thackeray Speech : आज गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. यंदाच्या मेळाव्याचे वेगळे महत्त्व आहे, कारण मनसेने आधीच जोरदार बॅनरबाजी करत वातावरण तापवलंय. राज्यातील राजकीय स्थिती, औरंगजेब कबर, विधानसभा निवडणुका, महानगरपालिका निवडणुका, लाडकी बहीण, आदी मुद्द्यांवरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यातून ते सरकारवर तोफ डागत असतात. मेळावा घेण्याची ही परंपरा गेल्या १९ वर्षांपासून सुरू आहे. आज देखील राज ठाकरेंची सभा होणार असून या सभेत ते कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित करतील. या सभेला महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातून मनसैनिक हजेरी लावतात. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

औरंगजेबची कबर

राज्याच्या विधानसभेत औरंगजेबाच्या कबरीवर मोठा गोंधळ उडाला होता. त्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दंगली उसळली होती. त्यावरून राज ठाकरे कोणावरून तोफ डागणार हे पाहावं औत्सुक्यचं ठरणार आहे. त्याच मुद्द्याबरोबर मु्ंबईतच मराठी माणसांची होणारी कुंचबणा यावरून राज ठाकरे कोणावर ताशेरे ओढणार हे पाहावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अवमानावर राज ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहावं लागले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील झालेल्या मतदानावरून राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. माजी आमदार राजू पाटील यांना त्यांच्या गावातून एकही मत मिळालं नाही, हे विशेष आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे आजच्या मेळाव्यातून ते काय बोलणार हे पाहावे लागेल.

बीएमसी निवडणूक

यंदाचा मेळावा आणखी महत्त्वाचा मानला जातोय. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली रणनीती स्पष्ट करतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ते मत आपले मत व्यक्त करतील. राज ठाकरे हे सातत्याने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करताना दिसत आहेत.

बीडमधील गुंडगिरी ते मराठा आरक्षण

बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाने राज्याला हादरून सोडलं होतं. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आलीय. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील गुंडगिरीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT