Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Ajit Pawar On Land Allegations: पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द केलाय. मात्र याप्रकरणात पार्थ पवार यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आली नाहीये. इतर तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय, मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचं अजित पवार म्हणालेत, त्याचे कारण आहे, ते जाणून घेऊ.
Ajit Pawar On Land Allegations:
Ajit Pawar addressing the media regarding the Koregaon Park land deal case involving Parth Pawar.saam tv
Published On
Summary
  • एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही. मग तो कसा रजिस्टर झालं याचा तपास केला पाहिजे.

  • एका महिन्याच्या आत सगळा तपास होईल

  • पारदर्शक चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे - अजित पवार

पुण्यातील कोरेगाव पार्कातील जमीन खरेदीचा व्यवहारावरून अजित पवार यांचे सूपुत्र पार्थ पवार अडचणीत आलेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला. या जमीन व्यवहाराची माहिती नव्हती. आता हा व्यवहार रद्द करण्यात आलाय. तसेच याप्रकरणी दोन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे.

पार्थ पवार यांची 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीत भागीदारी आहे. यातरीही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याचे उत्तर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिलं. जमिनीचा व्यवहार करताना पार्थ पवार नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून अजित पवार आणि सरकारवर टीका होतेय. होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ ३०० कोटी रुपयांत देण्यात आली.

हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आला होता. दरम्यान प्रकरणाची मुख्यमंत्री गंभीर दखल घेतली. आज अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आधीचं दिले होते. त्यामुळे कारवाईचे चक्रे फिरली. आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

Ajit Pawar On Land Allegations:
Pune News: पुण्यातील सर्वात मोठ्या जमीन घोटाळ्यात नाव आलेली शीतल तेजवानी आहे तरी कोण?

या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आलेत. सर्व दस्त देखील रद्द करण्यात आलेत, तसेच चौकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आलीय. महिनाभरात या प्रकरणातील अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत. पोलीस त्यांचं काम करणार. राजकीय हस्तक्षेप असण्याचं कारण नाही. पारदर्शक चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. कुणी सांगितल्यानं घडलं. कुणाचे फोन गेले होते, दबाव आणला होता का? कुणी आणला होता. अधिकाऱ्यांनी हे कसं केलं. हे चौकशीतून स्पष्ट होईल.

Ajit Pawar On Land Allegations:
१८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला 'तो' व्यवहारच रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

ही जमीन सरकारी आहे. सरकारी जमिनीचा व्यवहार होणार नाही. महारवतनाची जमीन आहे. अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. याबाबत समिती चौकशी करणार आहे. रजिस्ट्रेशन झालं कसं, कोण जबाबदार आहे, याची चौकशी समिती करेल. तीन लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहेत. त्यांची चौकशी केली जाईल.

पार्थ पवार असताना त्यांचं नाव कसं टाकलं नाही, असा प्रश्न अनेकांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, जे ऑफिसला आलेले होते,आणि ज्यांनी सह्या केल्या, त्यांच्यावर एफआयआर दाखल केलाय. त्यावेळी पार्थ पवार नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नसल्याचं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com