Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

Surabhi Jayashree Jagdish

मेदूवडा

आपल्यापैकी अनेकांनी मेदूवडा वडा खाल्ला असेल. कदाचित त्याच्या मधोमध असलेल्या होलबाबत तुम्हालाही कुतूहल वाटलं असेल.

आवडीचा नाश्ता

मेदूवडा हा स्वादिष्ट नाश्ता अनेकांना आवडतो, पण त्याच्या विशिष्ट आकारामागचं कारण माहिती नसेल. पाहताना हा फक्त एक साधा केलेला आकार वाटतो पण प्रत्यक्षात तो होल शिजवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.

होलशिवाय तळला तर...

विशेषतः दक्षिण भारतातील मिनपा वडा म्हणजेच उडीद डाळीपासून बनवलेला वडा हा जरा जाडसर असतो. जर तो मधल्या होलशिवाय तळला गेला, तर बाहेरून पटकन कुरकुरीत होतो, पण आतला भाग कच्चाच राहतो.

वडा पूर्ण शिजतो

या होलमुळे गरम तेल वड्याच्या बाह्य आणि आतील भागांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे वडा पूर्णपणे आणि समतोलपणे शिजतो.

डोनट्ससाठी वापरतात पद्धत

अशावेळी हा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा आदर्श वडा तयार होतो. हीच प्रक्रिया डोनट्स बनवताना वापरली जाते.

होल केल्याने काय होतं?

या होलमुळे तेल आतपर्यंत पोहोचू शकतं. तसंच शिजवण्याचा वेळ कमी होतो आणि वड्याची एकूण चव आणि पोत सुधारते. संपूर्ण वडा समतोलपणे शिजतो, ज्यामुळे त्याचा रंग सोनेरी होतो.

अतिरिक्त फायदेही

या छिद्राचे काही अतिरिक्त फायदेही आहेत. तळताना वड्याचा आकार टिकून राहतो. तळल्यानंतर अतिरिक्त तेल सहज निघून जातं आणि वडा तेलकट न होता हलकासा आणि कुरकुरीत राहतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा