
महानगरपालिका निवडणुकासाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही पक्षाची मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पक्ष मजबुतीसाठी राज ठाकरेंनी कंबर कसलीय. पक्षात काम न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज ठाकरेंना दिलाय. आज चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन पार पडला. यावेळी भाषण करताना पक्षात काम न करणाऱ्यांना सज्जद दम भरलाय.
मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ” यापुढे पक्षातील प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. आपल्याला राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीयेत. कामात दिरंगाई आढळल्यास पदावरून काढणार” अशा कडक शब्दात राज ठाकरेंनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली.
वर्धापनदिनी राज ठाकरे म्हणाले, मी आज जास्त बोलणार नसून पाडवा मेळाव्यात बोलणार आहे. यंदाचा पाडवा मेळावा राज ठाकरे काही मोठे निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले. आज १९वा वर्धापन दिन आहे. नजर लागू नये. प्रत्येकाला प्रश्न पडलाय, एवढे पराभव झाले तरी एकत्र कसे? आज काल राजकीय फेरीवाले आलेत, आज या फुटपाथवर , कोणी डोळा मारला की तिकडे, आपल्याला असले फेरीवाले नकोत, आपण पर्मनंट दुकान तयार करू.
दोन वर्षात पक्ष यंत्रणा आणखी मजबूत करू. त्यामुळे प्रत्येकाचे काम १५ दिवस पाहणार, वरपासून खालपर्यंत यंत्रणा लावलीय. जर काम करत नाही असे लक्षात आले तर पदावरून काढणार असल्याचा सज्जड दम राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरे यांनी आपण काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीत अनेक पदाधिकारी गैरहजर होते. त्यावेळी त्यांनी सर्वांची हजेरी घेतली. तेव्हा अनेकजण म्हणाले माझा हा आजारी होता. माझा तो आजारी होता, तर त्यातील काही जण मला म्हणाले की आम्ही कुंभला गेलो होतो. त्यावरून राज ठाकरेंनी पक्षाची कामे न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.