Raj Thackeray  X
महाराष्ट्र

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

Raj Thackeray Tightens Grip Before BMC Elections: मुंबईतील ८ विधानसभा विभागांमध्ये मनसेने नवीन विभागप्रमुख नेमले. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 'काम न करणाऱ्यांच्या जागी नव्यांना संधी' दिली गेली.

Bhagyashree Kamble

मुंबईतील ८ विधानसभा विभागांमध्ये मनसेने नवीन विभागप्रमुख नेमले.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 'काम न करणाऱ्यांच्या जागी नव्यांना संधी' दिली गेली.

२७ जुलैचा रंगशारदामधील मनसे मेळावा रद्द.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील आठ नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, यात विभाग अध्यक्षांचाही समावेश असणार आहे.

मनसेच्या वॉर्डनिहाय प्रचारात विभागप्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून ८ नव्या विभागप्रमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदी भाषिक समाजाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतीय व गुजराती मतदारसंख्या असलेल्या पश्चिम उपनगरात कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरे यांनी पुढीलप्रमाणे आठ नव्या विभागप्रमुखांची घोषणा केली.

मनसेच्या नव्या विभागप्रमुखांची यादी

प्रदीप वाघमारे – कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्ष

रवींद्र शेलार – अणुशक्ती नगर विधानसभा अध्यक्ष

महेश फरकासे – कांदिवली पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष

दीपक आर्य – जोगेश्वरी विधानसभा विभाग अध्यक्ष

पांडुरंग राणे – दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष

विश्वास मोरे – बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष

अनिल पंडित राजभोज – भांडुप विधानसभा विभाग अध्यक्ष

दिनेश पुंडे – मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्ष

'काम न करणाऱ्यांना हटवा'

राज ठाकरे यांनी केंद्रीय समितीला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, "जे कोणी काम करत नाहीत, त्यांच्या जागी पर्याय द्या." या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीनं विभागवार कार्याचा आढावा घेतला आणि त्यानुसार सुधारित यादी सादर केली. यावर अंतिम शिक्कामोर्तब करत जुन्या नियुक्त्या रद्द करत नव्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या.

मनसेचा उद्याचा मेळावा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २७ जुलै रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मेळावा होणार होता. मात्र, हा मेळावा अचानक पुढे ढकलण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सर्व विभागीय आणि उपविभागीय पदाधिकारी, शाखा अध्यक्ष आणि अंगिकृत संघटनांचे प्रमुख सहभागी होणार होते. मात्र, पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Chivda Recipe : 10 मिनिटांत बनवा उरलेल्या चपातीचा कुरकुरीत आणि चवदार चिवडा

भाजपने आणखी एक डाव टाकला, थेट आमदार फोडला, आज कमळ हातात घेणार?

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT