Amit Thackeray Meets Ashish Shelar: Saam Tv News
महाराष्ट्र

अमित ठाकरेंची आशिष शेलारांसोबत बैठक; नेमकी काय चर्चा झाली? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Amit Thackeray Meets Ashish Shelar: अमित ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची मुंबईत भेट घेतली. गणेशोत्सव काळातील शालेय आणि महाविद्यालयीन परिक्षा रद्द करण्याची मागणी केली.

Bhagyashree Kamble

  • अमित ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची मुंबईत भेट घेतली.

  • गणेशोत्सव काळातील शालेय आणि महाविद्यालयीन परिक्षा रद्द करण्याची मागणी केली.

  • या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झालेली नसल्याचे अमित ठाकरेंनी स्पष्ट केले.

  • या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील रस्ते आणि ट्रॅफिकच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. मात्र, आज राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली. या भेटीनंतर स्वतंत्र बैठक झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमित ठाकरेंनी पत्रकार परिषेदत भेटीमागचं कारण सांगितलं.

अमित ठाकरेंनी आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. गणेशोत्सव काळात परिक्षा पुढे ढकलण्याबाबत ठाकरेंनी शेलारांना निवेदन दिले आहे. अमित ठाकरेंनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली, याबाबत त्यांनी माहिती दिली. '२७ तारखेला गणेशोत्सव सुरू होतोय. पावसाळी अधिवेशनात आशिष शेलारांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला.'

'गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर आमच्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या. शाळा आणि कॉलेजमध्ये परिक्षा घेतल्या जातात. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर सर्वांनी हा सण आनंदात साजरा करायला हवा. अनेक जण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जातात. आई वडील गावी जातात. पण परिक्षानिमित्त मुलगा किंवा मुलगी घरी असते. यात कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होतं.'

'त्यामुळे आमची एवढीच मागणी होती की, या काळात शाळा आणि कॉलेजमधील सर्व बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्यात याव्यात. सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा. याच विषयावर चर्चा झाली', असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच स्वतंत्र बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झालेली नाही, असंही अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बसने अचनाक पेट घेतला; ड्रायव्हरच्या... अनर्थ टळला पहा व्हिडिओ

Shocking : सोशल मीडियावरची ओळख पडली महागात, लग्नाच्या भूलथापांना पडली बळी, ६ महिने सतत लैंगिक अत्याचार

Gautam Gaikwad Missing: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता; गायकवाडसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Devendra Fadnavis: जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे – देवेंद्र फडणवीस भावनिक|VIDEO

SCROLL FOR NEXT