Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaam TvNews

गणपती बसवण्यावरून वाद! २ कुटुंबात राडा, चाकू अन् दगडानं मारलं, एकाचा मृत्यू - २ जखमी

Chhatrapati Sambhajinagar: गणपती बसवण्यावरून संभाजी कॉलनीत दोन कुटुंबात भीषण हाणामारी झाली.या हल्ल्यात धारदार शस्त्र व दगडांचा वापर करण्यात आला. एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
Published on
Summary
  • गणपती बसवण्यावरून संभाजी कॉलनीत दोन कुटुंबात भीषण हाणामारी झाली.

  • या हल्ल्यात धारदार शस्त्र व दगडांचा वापर करण्यात आला.

  • एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

  • जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गणपती बसवण्यावरून दोन कुटुंबात तुफान वाद झाला. शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यात तीन जणांना चाकूने भोसकले. तर, तीन जणांना दगडाने मारले. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. इतर जखमींवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील जेएनसी कॉलेजच्यासमोर संभाजी कॉलनीमध्ये हा राडा झाला. गणपती बसवण्यावरून तसेच ढोल वाजवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुफान राडा झाला. शाब्दिक वाद सुरू असताना हाणामारी सुरू झाली. एका कुटुंबाने चाकूचा वापर केला. तर, दुसऱ्या कुटुंबाने दगडाने हल्ला केला.

Chhatrapati Sambhajinagar
अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

या हल्ल्यात तीन जणांना चाकूने भोसकले. तर, तीन जणांना दगडाने मारण्यात आले. या भयंकर हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जखमींना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
राष्ट्रध्वज फडकवल्यानं तरूणाला संपवलं, नक्षलवाद्यांनी अख्ख्या गावासमोरच शिक्षा सुनावली, नंतर फरफटत नेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com