बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

Tragedy in Gadchiroli: गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात बैलपोळा सणादिवशी ६ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेला. रिशान पुंगाटी हा मुलगा गावात खेळत असताना नाल्यात पडला. महसूल प्रशासन आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून मृतदेह शोधला.
Tragedy in Gadchiroli
Tragedy in GadchiroliSaam Tv News
Published On
Summary
  • गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात बैलपोळा सणादिवशी ६ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेला.

  • रिशान पुंगाटी हा मुलगा गावात खेळत असताना नाल्यात पडला.

  • महसूल प्रशासन आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून मृतदेह शोधला.

  • सततच्या पावसामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली असून स्थानिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाच्या सुट्ट्या घालवण्यासाठी गावात आलेल्या एका चिमुकल्यावर काळाने घाला घातला. खेळता खेळता तो नाल्यात पडून वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविले. या शोधमोहिमेत नाल्यात मृतदेह आढळला.

रिशान प्रकाश पुंगाटी (वय वर्ष ६) असे चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकला गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील रहिवासी आहे. लाहोरी येथील शासकीय आश्रम शाळेत तो इयत्ता पहिलीत शिकत होता. पोळा सण साजरा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणले होते. दरम्यान २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तो गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता.

Tragedy in Gadchiroli
देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघड

मात्र, खेळता खेळता तो नाल्यात पडला. गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहिम राबवली. मात्र, मुलाचा थांगपत्ता लागला नाही. महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा शोधमोहिम राबवली. तेव्हा चिमुकल्याचा मृतदेह नाल्यात आढळला. यानंतर त्याचा मृतदेह नाल्यातून काढत भामरागड येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

Tragedy in Gadchiroli
शरद पवार गटाला जोरदार धक्का; माजी आमदाराचा २,२७५ कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे गावात पाणी भरलं होतं. पूर आला होता. पुरातून वाट काढत खाटेवरून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर पुंगाटी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या भागात अजूनही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आदीवासी बांधवांनी रोष व्यक्त केला आहे. मृत्यूनंतरही प्रशासनाच्या मदतीच्या अभावी नरक यातना सहन करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com