Raj Thackeray Meeting In Thane SAAM TV
महाराष्ट्र

MNS on Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा तगडा 'प्लान'; राज ठाकरेंच्या ठाण्यातील बैठकीत काय ठरलं?

MNS On Loksabha Nivadnuk 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसते.

Nandkumar Joshi

विनय म्हात्रे, ठाणे

Raj Thackeray Meeting In Thane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या त्यांचे दौरे सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जय्यत तयारी सुरू केल्याचे दिसते. ठाण्यातही आज मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी तगडा 'प्लान' केल्याचं सांगितलं जात आहे. (Political News)

मनसे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दौरेही सुरू झाले आहेत. ठाण्यात आज मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या बैठकीत लोकसभेच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चारही जागा पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा निर्धार करण्यात आला.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितली पुढील दिशा!

ठाण्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'साम'च्या प्रतिनिधींनी केला. याबाबत अविनाश जाधव यांनी सांगितले की, 'मनसे लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ठाणे, पालघरमधील चारही जागा लढणार आहोत.'

राज ठाकरे यांनी ठाणे आणि पालघरमधील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या भागातील सध्याची परिस्थिती, इतर पक्षांच्या उमेदवारांची परिस्थिती आणि आपण कसे पुढे जाणार, काय दिशा असेल यावर या बैठकीत चर्चा झाली. आम्ही ठाण्यातील चारही जागा लढणार आहोत. ठाण्यात मोठी उलथापालथ होईल, असा विश्वासही अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.

मिशन मुंबई-गोवा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंनीही पनवेलमध्ये मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला होता. तर मेळाव्यानंतर काही तासांनीच मनसैनिकांनी ठेकेदाराच्या कार्यालयात तोडफोड केली होती. तर महामार्ग दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्याबाबतही ठाण्यातील बैठकीत चर्चा झाली. ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वीच कशी होईल, ते बघू. वेळ आलीच तर रस्त्यावर उतरू, असे जाधव म्हणाले.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले तरी आमची तयारी आहे. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही केलेल्या आंदोलनांमुळेच टोलनाके बंद झाले. काही रस्त्यांची दुरुस्ती झाली. आमच्या हजारो मनसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत. कोकणातला रस्ता चांगला होणार असेल तर, आमची तशी तयारीही आहे, असा निर्धारही जाधव यांनी बोलून दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT