Raj Thackeray's Speech on The Occasion of MNS 18th Vardhapan Din Saamtv
महाराष्ट्र

MNS 18th Vardhapan Din: राज्य एकदा माझ्या हातात द्या, सगळ्यांचे भोंगे बंद करतो.. राज ठाकरे कडाडले; १८ व्या वर्धापनदिनी काय शपथ घेतली?

Raj Thackeray Speech on MNS Vardhapan Din 2024 Live Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापनदिन. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे.

अभिजीत सोनावणे

Raj Thackeray Speech Nashik:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापनदिन. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे. आजच्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात काय भूमिका घेणार? नेत्यांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी यश नक्की मिळणार, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र...

"राजकारणात वावरायचे असेल, टिकायचं असेल तर लागणारी गोष्ट म्हणजे संयम. बाकीच्या राजकीय पक्षांच्या यश आत्ता दिसत आहे. २०१४ साली आलेलं यश मोदींचे (Narendra Modi) आहे. ते संपूर्ण श्रेय , त्या पक्षासाठी झटक असलेल्या कार्यकर्त्यांचं आहे. ५२ सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्ल्यात त्यात अडवाणी, अटलबिहारी, महाजन, मुंडे अशा अनेक लोकांनी इतकी वर्षे खस्ता खाल्ल्यात त्याच्यातून आलेले यश आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांवर टीका..

"मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय चाललंय? दुसऱ्याची पोरं कड्यावर घेऊन फिरवून जो आनंद मिळवताहेत, तसलं सुख नकोय मला. हे पक्ष उभं करणं आणि चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० वर्षे आधी आला. निवडून आलेल्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. शरद पवारसाहेब हेच करत आलेत आत्तापर्यंत. हा माझा पक्ष असा ते सांगतात, अशी टीकाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाडव्याच्या सभेत बोलणार..

"अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. ९ एप्रिलला शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या सभेला बोलायचं आहे. अनेक मनैसैनिकांनी माझ्यासकट तुरुंगवास भोगला, मराठी माणसासाठी. काही विरोधक आहेत, ते सगळ्या गोष्टी पसरवतात.सुरुवात करतात, पण शेवट करत नाहीत. एक आंदोलन दाखवा, त्याचा शेवट नाही केला," असे आव्हानही मनसे अध्यक्षांनी यावेळी केले.

माझ्या हातात राज्य द्या..

"भोंग्यावर बोललो की, १७ हजार जणांवर गुन्हे दाखल केले होते. काय चुकीचं होतं. सरकारचे दुर्लक्ष केल्यानंतर सगळं परत सुरू झालं. एकदा राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे भोंगे लावण्याची. असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोग्यांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT