MLA Yogesh Kadam  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट'; उद्धव ठाकरेंसह अनिल परब, संजय राऊतांवर याेगेश कदमांची टीका

आमदार याेगेश कदम यांनी ठाकरे गटावर चाैफेर टीका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश काेळी

Maharashtra Politics : कोल्ह्याला द्राक्षे मिळाली नाहीत तर ती आंबट होतात अशी खाेचक टीका आमदार योगेश कदम (mla yogesh kadam latest news) यांनी उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) केली आहे. तसेच आमदार कदम यांनी ऍडव्होकेट जनरल अनिल परब (anil parab) यांच्या चुकीच्या सल्ल्यामुळेच शिवसेना (shiv sena) नाव व धनुष्यबाण (bow and arrow) गेले असेही म्हटलं आहे. दरम्यान आधी पन्नास खोक्यांचा हिशोब द्या आणि मग दाेन हजार कोटींचा सौदा सिद्ध करून दाखवा असे आव्हान आमदार योगेश कदम यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी केली आहे. त्यावर बाेलताना शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी काेल्ह्याला द्राक्ष आंबट अशी खाेचक टीका केली.

आमदार याेगेश कदम म्हणाले ऍडव्होकेट जनरल अनिल परब यांनी दिलेले सल्ले चुकीचे निघाले. त्यामुळेच शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह तुम्हांला गमवावे लागले. जनतेला सत्य कळलंय, धनुष्यबाण गहाण ठेवून मुख्यमंत्री पदासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली करून तुम्ही गेलात.

जेंव्हा कोल्ह्याला द्राक्षे काढता येत नाहीत तेंव्हा ती त्याच्यासाठी आंबट होत असतात. धनुष्यबाण व शिवसेना हे नाव आपल्याला मिळणार नाही हे समजल्यानंतर आता त्यांच्याकडून हेच सांगितले जाणार, हे अपेक्षित होते असेही कदम यांनी नमूद केले.

खासदार संजय राऊत यांच्या आराेपांवर कदम म्हणाले ते अद्याप 50 खोक्यांचा हिशोब देऊ शकले नाहीत. आता ते दाेन हजार कोटींच्या सौद्याबद्दल बोलतायत, हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवा.

धनुष्यबाण आम्हाला मिळाल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या मनात बाळासाहेबांचे विचार अजून घट्ट निर्माण करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करणार आहोत. शिवसेना पक्ष अधिक बळकट करणार आहोत असेही आमदार योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT